संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
चालक वाहक जागीच ठार….एक जमखी
मौदा :- येथील कन्हान नदीच्या पुलावर महामार्ग 53वर भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला व एक जमखी झाला. जखमीला तात्काळ नागपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे कि आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास एम एच 40 सी एम 1295 हा ट्रक लोखंडी लहान पाईप भरून नागपूर कडे जात असतांना कन्हान नदीच्या पुलावर समोर जाणाऱ्या लोखंडाचे राळ भरून जात असलेल्या कंटेनर ला मागेहून धडक दिली. त्यात शुभम रामभुवन मिश्रा वय 24 वर्ष, विनोदकुमार मिश्रा वय 34 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला नागपूर येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. नागपूरकडे कंटेनर जात होता.
एका वाहणाला ओव्हरटक करण्याच्या बेतात मागील ट्रक चालक ह्याला झोप येत असावी व त्याने समोर असलेल्या कंटेनरला जबर धडक दिली. वाहतुक पोलीस यांच्या मदतीने मृतदेह काढण्यात आले शवविच्छेदन करिता नागपूरला पाठविण्यात आले.पोलीस अपघात झाल्यानंतर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु वेळेवर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांनी टीम पाठवून लवकरच वाहतूक सुळळीत केली.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद चौधरी करीत आहेत.