स्थानकावर दोघांची हत्या, दोघे गंभीर जखमी

– रेल्वेच्या लाकडी स्लीपरने डोक्यावर प्रहार, पहाटे सव्वा तीन वाजताची घटना, घटनेपूर्वी एका प्रवाशाला केली मारहाण, लोहमार्ग पोलिसांची पेट्रोलिंग नाही

नागपूर :- एका माथेफिरूने इसमाने पन्नास किलो वजनी रेल्वेच्या लाकडी स्लीपरने झोपेतील प्रवाशांचे डोके ठेचून रक्तबंबाळ केले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जखमींना मेयो रूग्णालयात नेले असता दोघांचा मृत्यू झाला. ही थरार घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म नंबर ६/७ वर घडली. गणेशकुमार डी. (५२) रा. तामिलनाडू असे मृतकाचे नाव आहे. दुसर्‍या मृतकाची ओळख पटली नाही. भगवान जखरेल (५०) आणि बलवंत जाटव (४५) रा. ग्वॉलेंर जखमींची नावे आहेत. लाकडी स्लीपर मारण्यापूर्वी आरोपीने दिनेश मेश्राम या प्रवाशालाही हातबुक्कीने मारहाण केली. लोहमार्ग पोलिस पेट्रोलिंगवर असते तर ही घटना घडलीच नसती अशी रेल्वे स्थानकावर चर्चा आहे.

या घटनेमुळे प्रवाशात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देवून घेतली आणि गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. पोलिसांनी आरोपी विरूध्द हत्येचा गुन्हा नोंदवून घटनेच्या काही वेळातच अटक केली आहे. जयराम केवट (४५) रा. उत्तरप्रदेश असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दिनेशच्या माहितीवरून पोलिस आरोपीच्या शोधासाठी निघाले. दरम्यान आरोपी रेल्वे रूळावर एका मुलाशी बोलत होता. त्याच वेळी पोलिसांनी त्याला पकडले.

या थरार प्रत्यक्षदर्शी दिनेश मेश्राम (३५) बडनेरा येथे राहातो. तो बुटीबोरी परिसरात मजुरीचे काम करतो. घरी जाण्यासाठी तो नागपूर रेल्वे स्थानकावर गेला होता. सकाळी तो रेल्वेने बडनेर्‍यासाठी निघणार होता. रात्र झाल्यामुळे तो फलाट क्रमांक ६/७ वर आराम करीत होता. दरम्यान आरोपी जयराम केवट हा फलाटावर आला. त्याने दिनेश सोबत वाद घातला. चप्पल आणि हातबुक्कीने मारहाण केली. घाबरलेला दिनेश जीव मुठीत घेवून पळाला. दरम्यान आरोपीने रेल्वे रूळाशेजारी पडलेली लाकडी स्लीपर उचलली. स्लीपरने झोपीतील प्रवाशांच्या डोक्यावर, छातीवर मारले. प्रवासी रक्तबंबाळ झाले. घटनास्थळी रक्ताचा सळा पडला होता. यानंतर आरोपी फुट ओव्हर ब्रिजने ईटारसी मार्गाकडे निघाला. हे दृष्य दूरवर उभा असलेल्या दिनेश पाहात होता. घटनेची माहिती आरपीएफ कंट्रोलकडून लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना मेयो रूग्णालयात दाखल केले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला. एका जखमीवर खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात आले. दिनेश हा प्रत्यक्षदर्शी असल्याने पोलिसांनी त्याचे बयान नोंदवून घेतले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक गौरव गावंडे आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे लक्ष द्या - मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे निर्देश

Tue Oct 8 , 2024
– दीक्षाभूमीवरील व्यवस्थेची केली पाहणी नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारंभानिमित्त दीक्षाभूमीवर येणा-या बौद्ध अनुयायांची सुविधा आणि आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या, असे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे करण्यात येत असलेल्या व्यवस्थेची सोमवारी (ता.७) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com