संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील न्यू गोंडेगाव येथील मारोतराव लसुंते यांचा निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरु संत भाकरे बाबा यांच्या १०४ व्या जयंती महोत्सव दोन दिवसीय कार्यक्रमाने थाटात साजरी करण्यात आली.
शनिवार (दि.८) फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता संत भाकरे बाबा यांच्या प्रतिमेचे पुजन व कलश स्थापनाने दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ करण्या त आला. सायंकाळी ५ वाजता दिपोत्सव, ६ ते ७ वाजे पर्यंत हरिपाठ आणि रात्री ९ वाजता पासुन जागृतीचे भजन करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी रविवार (दि.९) फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता ह.भ.प आशिष महा राज चटप यांचे गोपाल काल्याचे किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी ४ वाजता पासुन महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्रमाने संत भाकरे बाबा यांची जयंती महोत्सव थाटात संपन्न करण्यात आला. या महोत्सवाचा परिसरातील भाविक नागरिकां नी लाभ घेतला. सामाजिक कार्यकर्ते विलास लसुंते आणि सरिता लसुंते यांनी कार्यक्रमात सहभागी होणा ऱ्या पाहुण्यांचे आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले.