अरोली :- येथून जवळच असलेल्या तीळ संक्रातीच्या शुभ पर्वावर हनुमान मंदिरात महाप्रसादाने सुरुवात करणाऱ्या पिंपळगाव येथे दोन दिवसीय जलस्याला आज दिनांक 19 जानेवारी रविवार पासून सुरुवात होत आहे. 19 जानेवारी गुरुवार ला रात्री नऊ वाजता वडसा देसाईगंज चंद्रपूर यांच्या लावणीच्या कार्यक्रम तसेच 20 जानेवारीला शाहीर मोरेश्वर यांच्या दिवसभर राष्ट्रीय खडा तमाशा चे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्ष गावातील व परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर राहणार असून या दोन दिवसीय जलस्याचा लाभ घेण्याचे आव्हान सरपंच निशा शंकर चाफले सह आयोजकांनी केले आहे, अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणता राजा (आदर्श) क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आशिष चाफले यांनी दिली.