उद्योग केंद्रामार्फत दोन दिवसीय निर्यातदारांची कार्यशाळा

नागपूर :-  राज्य शासनाचे उद्योग संचालनालय मुंबई अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत एक जिल्हा एक उत्पादन गुंतवणूक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण निर्यात याविषयी दोन दिवसांची कार्यशाळा 23 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. एस. मुद्दमवार यांनी केले आहे.

गुंतवणूक वृद्धी व्यवसाय सुलभीकरण निर्यात व एक जिल्हा एक उत्पादनाबाबत निर्यातदारांची ही कार्यशाळा असून 23 व 24 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत उद्योग भवन सिव्हिल लाईन येथे होणार आहे. निर्यातीच्या क्षेत्रात कार्यरत असणारे व या क्षेत्रात आपले करिअर घडू इच्छिणाऱ्या, नव्या निर्यातदारांनी, व्यावसायिकांनी, आयात -निर्यात करणाऱ्यांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा. मोठ्या संख्येने या संदर्भातील तांत्रिक कायदेशीर ज्ञान प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी आणि नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत. निमंत्रित निर्यातदारांनी या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाव्यवस्थापक एस.एस. मुद्दमवार तसेच उद्योग विभागाचे सहसंचालक गजानन भारती यांनी केले आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शुध्द कोळशामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही - खनिकर्म मंत्री दादा भूसे

Thu Sep 22 , 2022
नागपूर :-  कोल वॉशरिजमुळे विद्युत प्रकल्पांना शुध्द व स्वच्छ कोळसा मिळतो. त्यामुळे पर्यावरण प्रदुषित होणार नाही. त्यासोबतच शुध्द कोळसा मिळल्यामुळे विद्युत उत्पादन निर्मितीमध्ये बचत होणार असल्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भूसे यांनी सांगितले. कन्हान जवळील गोंडेगाव कोल वॉशरिज भेट देवून पाहणी करतांना ते बोलत होते. आमदार आशिष जायसवाल, मॅगनिज महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम.जे. प्रदीप चंद्रन, रामटेकच्या उपविभागीय अधिकारी वंदना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com