संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवस महोत्सवा निमित्य वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रबोधनाचा कार्यक्रम व दुस-या दिवसी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वर भव्य भोजनदान करून भारतीय बौद्ध महासभाव्दारे दोन दिवसीय धम्म महोत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय बौद्ध महासभाव्दारे मंगळवार (दि.४) ऑक्टोंबर ला ६६ वा धम्म चक्र परिवर्तन दिवसाच्या पुर्व संध्येला वाघोली गावात पहिल्या दिवसी प्रसिध्द प्रबोधनकार विजयजी भारती यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाने सुरूवात करण्यात आली. दुस-या दिवसी बुधवार (दि.५) ला नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग वरून नागपुरच्या ऐतिहासिक दिक्षाभुमिवर देश, विदेश आणि विविध राज्यातुन येणा-या धम्मप्रेमी यां करिता सकाळी चना, पोहा चा नास्ता व सकाळी ८ वाजता पासुन वाघोली बस स्टापवर भव्य भोजनदान करण्यात आले. या कार्यक्रमाचा हजारो धम्मप्रेमीनी लाभ घेतला. या कार्यक्रमास वाघोली, गोंडेगाव, घाटरोहणा, वराडा, टेकाडी, नांदगाव, एसंबा, साटक, बनपुरी, तेलनखेड़ी, बोरडा, नीमखेड़ा, गहुहिवरा, खंडाळा, निलज, बखारी, डुमरी, मेहंदी आदी गावाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता भारतीय बौद्ध महासभाचे ज्येष्ठ नेते सिद्धार्थ कांबळे, सामाजिक समाजसेवक चंद्रमणी पाटिल, प्रयास कांबळे, बाबुलाल प्रसाद, रतन भेलावे, दिवाकर पौनिकर, विनोद रंगारी, शेखर पौनिकर, राजु मेश्राम, दिगांबर ठाकरे, पुंडलिक मेश्राम, प्रकाश वरकडे, सूर्यभान दीपके, देवा डोंगरे उपसरपंच निमखेडा, दिनेश रंगारी, मिलिंद देशभ्रतार सह पदाधिकारी व कार्यकर्ता नी अथक परिश्रम घेतले.