मौंदा तहसिलचे अधिकारी असल्याचे खोटे सांगुन ट्रक चालकाचे अकरा हजार लुटणाऱ्या दोघांना अटक 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड वरील सिंगारदिप बस स्टाप जवळ कन्हानकडे येणा-या टाटा टिप्पर चालकास स्वीप्ट कारने येऊन ट्रक चालकास थांबवुन मौदा तहसिलचे अधिकारी असल्याचे खोटे सांगुन कार्यवाहीची भिती दाखवुन धमकावुन जबरीने ११००० रूपये हिसकावुन घेतल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी कार सह दोघाना पकडुन त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

आकाश भाउराव कांबळे वय ३० वर्ष धंदा- चालक मालक रा. सोनार मोहल्ला पिपरी कन्हान ता. पारशिवनी, ह.मु. सोनेगाव (उनगाव) ता. कामठी जि नागपुर मागील २ वर्षापासुन सोनेगावला पत्नी व मुला बाळसह राहत असुन त्यानी टाटा एस टिप्पर ट्रक क्र एमएच ३१ सीक्यु ६५७७ सन २०१९ ला विकत घेऊन सध्या पाचगाव वरून गिट्टीवर गाडी चालवित आहे. आज बुधवार (दि.६) ला सकाळी पाचगाव ला जावुन गिट्टी भरून धानला गावी खाली करून तारसा रोडने कन्हान ला गाडीचे काम करणे करीता येत असताना सिगारदिप बस स्टॉप जवळ सकाळी १० वाजता दर म्यान दोन अनोळखी इसम स्वीप्ट डिजायर कार क्र. एमएच २७ एआर ५६८१ ने ट्रकचे पुढे येवुन गाडीला थाबण्याचा इशारा करून गाडी थाबवली. कारचा ड्रायव्हर जवळ येवुन आम्ही तहसिल मौदाचे अधिकारी आहोत असे म्हणुन रॉयल्टी विचारली व कार मध्ये बसलेल्या साहेबाना जावुन भेट असे म्हटल्याने आकाश कांबळे खाली उतरून कार मधिल इसमाला भेटले असता तो दारु पेवुन होता. त्याने रायल्टी करिता विचारणा केली असता माल खाली केला तिथे ऐरीकेशन वाल्याना रॉयल्टी दिल्याचे सांगितले. तरी पण काही न ऐकता रॉयल्टी दे नाही तर गाडी पोलीस स्टेशन ला लावतो. मी तहसिल चा अधिकारी आहे. गाडी लावायची नसेल तर वीस हजार रूपये दे असे म्हटल्याने त्याचे जवळ असलेले गिट्टीचे १३००० रू. चे (५०० च्या २६ नोटा) बडल काढले असता स्वतःला अधिकारी म्हणणा-याने ती रक्कम जबरीने हिसकली असता माझे कडे डिजल करिता पैसे नसल्याने थोडेफार पैसे परत करा म्हटल्याने त्यांनी २००० रू (५०० च्या ४ नोटा) परत केले. आकाश कांबळे थोडा समोर आल्या वर त्यांचेवर संशय आल्याने लगेच पोलीस स्टेशन कन्हान ला फोन केल्याने पोलीस स्टेशन वरून पोलीस स्टॉफ येऊन त्यांनी त्या दोन इसमाना पकडुन विचार पुस केली असता कार मध्ये बसलेला इसम दिनेश अरुण माने वय ४३ वर्ष रा. बाबदेव वार्ड क्र.३ मौदा जि. नागपुर व बाहेर येवुन टिप्पर थाबविणारा इसम किशोर मुकेश मानवटकर वय ३७ वर्ष रा. चिरव्हा ता मौदा जि. नागपुर असे सांगितल्याने त्याना पोस्टे कन्हान ला आणुन कन्हान पोलीसानी फिर्यादी आकाश कांबळे हे स्वत:च्या टाटा एस टिप्पर क्र एम एच ३१ सीक्यु ६५७७ ने कन्हान कडे येताना सिगार दिप बस स्टॉप जवळ दिनेश अरुण माने व किशोर मुकेश मानवटकर या दोघानी अडवुन तहसिलचे अधि कारी असल्याचे सांगुन कार्यवाहीची भिती दाखवुन धमकावुन जबरीने ११००० रूपये हिसकावुन घेतल्या ने. फिर्यादीच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी थानेदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात पोस्टे कन्हान येथे दोन्ही आरोपी विरूध्द कलम ३९२, १७०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे उप पोलिस निरिक्षक चव्हाण पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रिझर्व्ह बँकेच्यावतीने क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम

Thu Mar 7 , 2024
यवतमाळ :- आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त विद्यार्थी आणि युवकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नागपूर कार्यालयाच्यावतीने यवतमाळ येथे क्षेत्रस्तरीय आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बँकेच्या तज्ञांनी यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सहायक महाप्रबंधक शशांक हरदेनिया, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक जी.एल.नरवाल, भारतीय स्टेट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक कौस्तव चक्रवर्ती, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दीपक पेंदाम, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!