अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील कारंजा येथील भादरूटोला येथील ८ मुल गाव जवळ असलेल्या शेत तळ्यात पोहायला गेले असुन पाण्याचा अंदाज न आल्याने दोन ८ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतक मध्ये पवन विजय गाते ८ वर्ष , वंश जयप्रकाश उपराडे ८ वर्ष रा. भदरुटोला कारंजा असे आहे. दोन्ही मुलांचे मृत देह पाण्यातुन काढण्यात आले, असून मृत देह सविच्छेदन करण्यासाठी गोंदिया येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.