मंगळवारी ६५ प्लास्टिक पतंगे जप्त

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूरता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता. २१ डिसेंबर) प्लास्टिक पतंग विरोधात कारवाई करीत  ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त केले. या कारवाईत १०,०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध  पथकाद्वारे लक्ष्मीनगर आणि धंतोली झोनमधील १० पतंग दुकानांची तपासणी करुन ६५ प्लास्टिक पतंग आणि ५२ नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले. शोध पथकाने १० झोन मध्ये ५४ दुकानांची तपासणी केली.

याशिवाय उपद्रव शोध पथकाने ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. १५,००० चा दंड वसूल केला. पथकाने २५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली    

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

मास्क शिवाय फिरणा-यांवर कारवाई

Tue Dec 21 , 2021
नागपूर,ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी सोमवारी (२० डिसेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या १६ बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही महिन्यात उपद्रव शोध पथकाने ४२३८० नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,९५,४९,०००/- चा दंड वसूल केला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com