संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अनागारीक धम्मपाल यांनी भारत देशात लोप पावलेल्या बौद्ध धंम्माला पुनर्जीवित केले बंजर भुमीला सुपिक केले बौद्ध धम्म, साहित्य, लेणी चैत्य स्तुप संस्थागार, भीक्खुसंघ पुनर्स्थापित केले व जागतीक धम्मध्वज फडकविला श्रीलंकेत जन्म घेऊन भारतातील सारनाथ येथे जिवनाचा निरोध घेतला स्मृतीशेष बाबूलाल वाघमारे यांनी आयुष्याचे अर्ध शतक जिवन जगले आंबेडकर चळवळीत असंख्य आदोलनात अग्रगण्य भुमीका बजावत असतानाच जनसामान्य लोकांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य जिवनावश्यक गरजा सामाजिक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक व्यथा वेदनांना शासन प्रशासन दरबारी सतत पाठपुरावा करून न्याय मिळवुन देण्यासाठी तत्पर असणारा नागरी सोई सुविधा साठी मनपा नासुप्र पोलीस प्रशासन,आदी शासकिय कार्यालयामध्ये पायाला भिंगरी बांधल्या गत कार्यरत नागपुरी फटका, नागतिर जनता आदी दैनिक वर्तमान पत्राचा पत्रकार, नामांकित दैनिक वर्तमान पत्रा मध्ये जनसामान्य लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संपादक पत्रकार, यांचेशी मैत्रीचे नाते जपणारा धार्मिक साहित्यिक आदी विद्वान अभ्यासक, भीक्खुसंघ आदींशी घनिष्ट संबंध जोपासनारा झजावात अन्याय अत्याचार विरोधात सतत आक्रोश व्यक्त करूण समाज मन चेतवनारा सेनानी अष्टपैलू व्यक्तीमंत्वाचा धनी निस्वार्थ निष्पाप निर्विकार, निष्कलंक योध्दा यांच्या स्मृतीस अभिवादन करूण श्रद्धांजली प्रसंगी भदंन्त नाग दिपंकर महास्थविर यांनी व्यक्त केले
कर्मवीर अॅड हरिदास आवळे चौक येथील परिसरात स्मृतीशेष बाबूलाल वाघमारे मित्र परिवार, समुहघोष सामाजिक संस्था उदघोष एक मैत्री संघ, रिपब्लिकन मुव्हमेट, जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन बहुउद्देशिय संस्था आदी च्या माध्यमातुन कार्यक्रम आयोजित करण्यात आले या प्रसंगी कविवर्य इ मो नारनवरे, भोला सरवर, नरेश वाहाणे, उमेश बोरकर अशोक नगरारे प्रमोद किटके, संजय फुलझेले राजकुमार मेश्राम, नवनित मोटघरे,प्रभाकर पानतावने पुष्पराज तिडके सुरेश पाटील नामदेव खोबरागडे राजन वाघमारे मुकुल राऊत राकेश खोबरागडे भगवान भीवगडे जयप्रकाश भीवगडे कल्पनाताई द्रोणकर आदीनी मार्गदर्शन केले.