विधानसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

मुंबई :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव मांडला. विधानसभेत दिवंगत सदस्यांना यावेळी सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिवंगत सदस्य पांडुरंग निवृत्ती पाटील (सडोलीकर), माजी मंत्री प्रतापराव बाबुराव भोसले, माजी राज्यमंत्री मिनाक्षी प्रभाकर पाटील, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेवराव गाडे, माजी सदस्य त्र्यंबक पांडुरंगराव कांबळे, दगडू यशवंतराव गलंडे, डॉमनिक जॉन गोन्सालवीस, विश्वास कृष्णराव गांगुर्डे, गंगाराम पोशट्टी ठक्करवाड यांच्या दुःखद निधनाबद्दल आज विधानसभेत शोकप्रस्ताव सादर करण्यात आला.

दिवंगत सदस्यांच्या कार्याला यावेळी अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी उजाळा दिला. सभागृहात दोन मिनिटे मौन बाळगून दिवंगत सदस्यांना सर्व उपस्थित सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दराबाबत महत्वाची बैठक

Thu Jun 27 , 2024
मुंबई :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दुध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवार २९ जून २०२४ रोजी विधानभवनात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्यातील खाजगी तथा सहकारी दूध महासंघाचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड यांनी सांगितले. या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com