विधानसभेत हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांना आज विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. सभागृहाच्यावतीने अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी शोकसंदेश वाचून दाखविला.

शोकसंदेशात ॲड. नार्वेकर म्हणाले, हिराबेन मोदी यांनी नुकतीच आपल्या वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आईंचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी तसे एका मुलाखतीत बोलून दाखविले होते. आपल्या आईने जीवनात अनेक कष्ट केले असल्याचा उल्लेख  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री निवासस्थानी त्या केवळ एकदाच गेल्या होत्या. नोटाबंदीच्या आपल्या मुलाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ त्या एटीएमच्या रांगेतही उभ्या राहिल्या होत्या.

त्यांचे जीवन ही एक सर्वसामान्य कुटुंबाची कथा आहे. त्यांच्या बालवयातील संघर्षाचे स्मरण औचित्यपूर्ण ठरेल. त्यांनी नरेंद्र मोदी यांना ‘काम करो बुद्धीसे और जीवन जीयो शुद्धी से’ असा जीवन संदेश दिला होता, असे नार्वेकर यांनी आपल्या शोकसंदेशात म्हंटले आहे.

सभागृहाच्यावतीने दिवंगत हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या निधनाबद्दल स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकप्रस्तावाची एक प्रत शोकाकूल कुटुंबाला पाठविण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने ९६ वा वर्धापनदिन व रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा येत्या 2 जानेवारी रोजी.

Sat Dec 31 , 2022
नागपूर :- सेवासदन संस्थेच्या प्रेरणापुंज स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या कार्याच्या गौरवार्थ सेवासदन शिक्षण संस्थेच्यावतीने विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार संस्थेच्या ९६ व्या वर्धापनादिनी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी आणि सचिव वासंती भागवत यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला भगतसिंग कोश्यारी राज्यपाल (महाराष्ट्र राज्य ) यांची प्रामुख्याने अध्यक्षपदी म्हणून उपस्थिती राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com