सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने ९६ वा वर्धापनदिन व रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा येत्या 2 जानेवारी रोजी.

नागपूर :- सेवासदन संस्थेच्या प्रेरणापुंज स्वर्गीय रमाबाई रानडे यांच्या कार्याच्या गौरवार्थ सेवासदन शिक्षण संस्थेच्यावतीने विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार संस्थेच्या ९६ व्या वर्धापनादिनी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी आणि सचिव वासंती भागवत यांनी दिली आहे. या कार्यक्रमाला भगतसिंग कोश्यारी राज्यपाल (महाराष्ट्र राज्य ) यांची प्रामुख्याने अध्यक्षपदी म्हणून उपस्थिती राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अनिरुद्ध देशपांडे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि विशेष अतिथी म्हणून लेखक यशवंत कानेटकर भारतीय संगणक विज्ञान तसेच विशेष उपस्थितीत शिक्षक आमदार नागो गाणार यांची उपस्थिती राहणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा सोमवार दिनांक 2 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5:30 वाजता. सेवासदन शिक्षण संस्थेचे प्रांगण, झाशी राणी मेट्रो स्टेशन, सिताबर्डी नागपूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com