आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची शासकीय वसतिगृहाला भेट, विद्यार्थिनींशी साधला संवाद

गडचिरोली :- आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आज रात्री गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या सोयीसुविधांबाबत आस्थेने विचारपूस केली. विद्यार्थिनींच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या शिक्षण आणि राहणीमानाच्या विकासासाठी शासनाकडून त्यांना कोणत्या सुविधा अपेक्षित आहेत, याबाबत मंत्री उईके यांनी माहिती घेतली.

यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीना उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रामटेक महोत्सवात उदित-आदित्‍य नारायण यांच्या सुरांची श्रोत्यांना भुरळ

Sat Jan 25 , 2025
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांची विशेष उपस्थिती  ▪️‘बडे मियॉं- छोटे मियॉं’ ने मंच गाजवला नागपूर /रामटेक :- रामटेक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पद्मभूषण, पद्मश्री उदित नारायण व आदित्य नारायण यांनी आपल्या लोकप्रिय गाण्याद्वारे प्रेक्षकांना भुरळ घातली. ‘बडे मियां तो बडे मियां छोटे मियां सुभान अल्ला’ असे म्हणत आदित्य नारायण यांनी पद्मभूषण उदित नारायण यांना आदरपूर्वक स्टेजवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!