संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- संत तुकडोजी महाराजांनी सांगीतल्यानुसार ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ ही म्हण कायम लक्षात घेत वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा असे मौलिक प्रतिपादन फ्युचर युथ फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष अनुप डोंगरे यांनी नवयुवक उच्च प्राथमिक शाळा परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त फ्युचर युथ फाउंडेशन च्या वतीने ग्रामविकास एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालीत नवयुवक उच्च प्राथमिक शाळा कामठी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी प्रामुख्याने ग्रामविकास एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष सीताराम रडके, भदंत नागदीपणकर, अनुप डोंगरे, अरुणा रायबोले, मुख्याध्यापक विजय नंदनवार उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही एक चळवळ व्हायला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फ्युचर युथ फाउंडेशनचे पदाधिकारी अमित डोंगरे, सुशांत मोखाडे, रविना ढोके,स्वप्नील रायबोले, रिना बन्सोड,शर्मीला भोतकर,ज्योती लिल्हारे,विनय बोरकर आदींनी सहभाग दर्शविला.
कार्यक्रमाचे संचालन राजकुमार शेंडे,तर आभार दिलीप मस्के यांनी मानले.या वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक उच्च प्रथमिक शाळा चे मयुरी यादव,नाजूका मांनवटकर,राखी बागडे,विभा सोनडवले आदींनी मोलाचे सहकार्य केले.