संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 6 :- ढासळत चाललेल्या वातावरणाचा वाढता दुष्परिणाम लक्षात घेता ग्लोबल वार्मिंगमुळे ऋतूमध्ये बदल होत चालला आहे तेव्हा वातावरणाच्या संगोपनासाठी वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत कामठी नगर परिषद चे शहर समन्वयक अमोल कारवटकर यांनी कामठी नगर परिषद परिसरात माझी वसुंधरा अभियान अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले.
कामठी नगर परिषद व डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी)पुणे यांच्या वतीने समता दूत सुनीता गेडाम यांनी दिलेल्या शासन निर्देशानुसार व माझी वसुंधरा अभियान 3.0अंतर्गत आज 6 जुलै ला वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां, समता दूत सुनीता गेडाम यांच्या हस्ते एका रोपट्याची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी दर्शन गोंडाणे, सारिका परदेसी, माधुरी नेरकर, झिबल गजबे, अमर झंझोटे,पारितोष नागदेवें व इतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
वृक्ष संवर्धन ही काळाची गरज-अमोल कारवटकर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com