हृदय रोग तपासणी शिबिरात 138 बालकांवर उपचार

गडचिरोली :- जिल्ह्यात आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमांतर्गत बालकांमधील जन्मजात हृदय रोग निदान निश्चिती करिता 21 व 22 जून रोजीदोन दिवशीय २ डी ईको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात हृदयरोग संशयित बालकांची पहिल्या दिवशी एकूण ६४ व दुसरा दिवशी ७४ असे एकूण 138 बालकांची २डी ईको तपासणी मोफत करण्यात आली. या शिबिरामध्ये पात्र बालकांचे आरबीएसके-डीईआयसीतर्फे सर्व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत आखाडे, यांच्या नियोजनामध्ये बाल हृदयरोग तज्ञ डॉ. प्रणीत लाले, किंग्सवे रुग्णालय नागपूर यांच्या मार्फत शिबीरात बालकांची तपासणी करण्यात आली.

यावेळी बालकांच्या हृदयरोग आजाराचे निदान झालेले पालक संभ्रमित असल्याने त्यांना योग्य समुपदेशन, मार्गदर्शन करण्यात आले. ज्या उच्चस्तरीय तपासणी व सल्ला करिता जिल्ह्याबाहेर नागपूर-चंद्रपूर येथे जावे लागायचे हि सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने व पालकांचे आर्थिक व मानसिक त्रास टळल्याने पालक समाधान व्यक्त करीत आहेत. वेळीच निदान केल्यामुले लहान चिमुरड्यामधेही हृदयविकार आढळून येतो नाही तर आयुष्यभर बाळाला आजाराशी झुंजतच जगावे लागले असते.

जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विद्यार्थी यांच्या अंगणवाडी, शाळा, आश्रमशाळा येथील प्राथमिक तपासणी करिता “मोबाईल हेल्थ टीम” म्हणून (आरबीएसके) “राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम” कार्यरत आहे तसेच पुढील तपासणी, निदान निश्चिती, उपचार करिता “द्वितीय स्तरीय संदर्भ सेवा कक्ष” म्हणून (डीईआयसी) “डीस्ट्रीक्त अर्ली इंटरवेन्शन सेंटर, जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे स्थापित असून सदर आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमांतर्गत जन्मजात असणारे आजार, शारीरिक व बौद्धिक विकासात्मक वाढीतील दोष, जीवनसत्वाच्या अभावामुळे उद्भवणारे आजार, बालपणातील आजार, व इतर बालकांच्या आरोग्य तपासण्या व उपचार केले जातात.

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विध्यार्थीसाठी एकदा आरोग्य तपासणीचे नियोजन असते. अंगणवाडी-शालेय आरोग्य तपासणी दरम्यान बालकांमधील आढळलेले जन्मता असणारे दोष तसेच एसएनसीयु येथील गंभीर बालके जसे कि जन्मजात बहिरेपणा, जन्मजात हृदयरोग, जन्मजात तिरळेपणा, जन्मजात मोतीबिंदू, जन्मजात फाटलेले ओठ व टाळू, जन्मजात वाकडे पाय, न्यूरल ट्यूब डीफेक्त, डाऊन सिंड्रोम ई. किरकोळ तथा गंभीर आजाराची बालके/विध्यार्थी यांना पुढील उपचाराकरिता(डीईआयसी)डीस्ट्रीक्त अर्ली इंटरवेन्शन सेंटर येथे संदर्भित करण्यात येते.

शिबिराच्या यशस्वीतेकारिता डीईआयसी अधिकारी/कर्मचारी तथा आरबीएसके समन्वयक व वैद्यकीय अधिकारी/ कर्मचारी, यांनी मेहनत घेतली. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली डॉ. प्रमोद खंडाते यांनी कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिल्हा परिषदेंतर्गत कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन

Thu Jun 27 , 2024
गडचिरोली :- जिल्ह्यातील बियाणे, खते व किटकनाशके यांच्या गुणवत्ता व पुरवठ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी, कंपनी प्रतिनिधी, बियाणे, खते व किटकनाशके विक्रेते व नागरिकांनी त्यांच्या तक्रारी संबंधात सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ०७ या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ८२७५६९०१६९ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com