निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण संपन्न

गडचिरोली :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सूक्ष्म निरीक्षकांचे (मायक्रो ऑब्झर्व्हर) प्रशिक्षण आज पार पडले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या प्रशिक्षणाला निवडणूक निरीक्षक राहुल कुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, नोडल अधिकारी प्रशांत शिर्के आदी उपस्थित होते.

प्रशिक्षणात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी त्यामध्ये येणाऱ्या अडी-अडचणींचे निराकरण, मॉकपोल पध्दती, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकारी यांच्यातील समन्वय, मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य आदि बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले.

मतमोजणी केंद्राची मांडणी व नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या, सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य, संनियंत्रण पद्धती, अडचणी आल्यास करावयाच्या उपाययोजना अशा अनेक विषयांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे निवडणूक निरीक्षक राहुल कुमार यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात केले. प्रशिक्षणास निवडणूक कामासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महीलांचा सन्मान राखणाऱ्या महायुतीलाच मतदान करा - राजश्री पाटील

Tue Apr 16 , 2024
यवतमाळ :- मोदी सरकारमध्ये महिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान राखल्या गेला. महीलांना राजकीय आरक्षण, प्रवासात सुट, अपत्याच्या नावासमोर हक्काची ओळख आणि आता तब्बल तीन कोटी महीलांना “ लखपती दिदि” बनविण्याचा मोदी सरकारचा निर्णय महीला धोरण स्पष्ट करणारा असल्याने महायुतीलाच मतदान करा, असे आवाहन महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी तुपटाकळी येथील प्रचार सभेत केले. या सभेला नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. महायुतीच्या उमेदवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com