मुंबई :- भारतीय जनता पार्टीतर्फे पक्षाचे प्रवक्ते आणि पक्षाच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांसाठी 17 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गात राष्ट्रीय प्रवक्ते खा.सुधांशु त्रिवेदी, भाजपा माध्यम विभाग केंद्रीय समन्वयक आ.अतुल भातखळकर आदींचे मार्गदर्शन होणार आहे. भाजपा मीडिया सेंटर, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे हा वर्ग होणार आहे.