नागपूर : भारत सरकार कार्मिक व प्रशिक्षण विभाग (डिओपीटी) पुरस्कृत सेंट्रल प्लॅन स्क्रीम अंतर्गत माहितीचा अधिकार 2005 दूरशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन विदर्भातील नागरिकांसाठी विनामूल्य करण्यात आले आहे. 100 प्रशिक्षणार्थीना वनामती नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येईल.
दूरशिक्षण अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्यक्रम तीन महिन्याचे असून दुसरे सत्र रविवार दिनांक 26 फेब्रुवारी 2023 तर तिसरे सत्र रविवार 19 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. 50 प्रशिक्षणार्थीची एक तुकडी याप्रमाणे 100 प्रशिक्षणार्थीकरिता दोन तुकड्यांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. इच्छुक नागरिकांनी प्रवेश अर्ज आणि प्रवेशाकरिता वनामती नागपूर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी केंद्राचे संशोधन अधिकारी दादु बुळे यांच्याशी 020-25608216, 9823082372 येथे संपर्क साधावा.
@ फाईल फोटो