टॉवर्स मांनववस्तीपासून दूर असावेत

कामठी :- कामठी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे टॉवर्स उभारले आहेत मात्रया टॉवर्स मधून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने टॉवर्स हे मांनववस्तीपासून दूर असावे अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे.

सध्याचा काळ हा आधुनिकतेचा आहे या युगात जग अत्यंत जवळ आले आहे. क्षणभरात लाखो किलोमीटर अंतरावरील व्यक्तीशी संवाद साधणे अत्यंत सहज आणि सोपे झाले आहे त्यासाठी भ्रमणध्वनिला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे परिणामी आता खेडोपाडी भ्रमणध्वनी पोहोचले आहेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी पोहोचल्याने अगदी गुराख्याच्या व भंगार कामगारांच्या हातातही भ्रमणध्वनी दिसून येतो.गावोगावी एकाच घरात अनेक भ्रमणध्वनी असल्याची उदाहरणे आहेत .

भ्रमणध्वनीच्या कव्हरेज साठी अनेक गावांमध्ये टॉवर्स उभारले आहेत हेच टॉवर्स ग्रामस्थासाठी घातक ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे या टॉवर्स मार्फतच संबंधित भ्रमणध्वनी कंपणो आपल्या ग्राहकांना सेवा पुरविते त्यातून निघणाऱ्या उच्च लहरींमुळे वातावरणातील प्रदूषण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे त्याचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतो सोबतच इतर पशुपक्षी वरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते .केंद्र सरकारने सण 1996 मध्ये नवीन पर्यावरण कायदा अस्तित्वात आणला परंतु या कायद्याची टॉवर्स उभारताना सर्रास पायामल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.या कायद्यानुसार टॉवर्स उभारनीसाठी काही मार्गदर्शक तत्वे पाळण्याचे बंधन घालण्यात आले आहे.टॉवर्स हे मानवी जीवनाला अपायकारक ठरण्याची शक्यता आहे.अनेक गावामध्ये हे टॉवर्स विजेवर चालतात , वीज नसल्यास डिझेलचा वापर करण्यात येतो त्यातूनही प्रदूषणाला चालना मिळते त्यामुळे भ्रमणध्वनी ही आवश्यक वस्तू झाली असली तरी त्याकडे जागृतत्तेने बघण्याची गरज आहे.

टॉवर्स च्या लहरींमुळे कर्करोग, हृदयरोगाची भितो तसेच डोळ्यांचे व हाडांचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही तशी सूचना विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधन मंडळाने वर्तविली आहे.टॉवर्स मधून निघणाऱ्या कीरणोत्सवाच्या लहरींमुळे लहांन मुलांना व्यगत्व, आंधळेपणा ही येण्याची शक्यता असते एकूणच टॉवर्स मांनववस्तीपासून दूर असावेत .टॉवर्स 200 फूट उंच असले तरी त्यातुन निघणाऱ्या उच्च कोरणोत्सर लहरी 200 फूट समांतर जमिनीस सिमेंट कंक्रोट च्या भिंती भेदून आरपार जाऊ शकतात त्यामुळे मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मागील चार वर्षपासून तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कारवाहीच नाही

Thu Apr 20 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन पडली धूळखात कामठी :- मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील चार वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे.कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील चार वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून ना दंड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com