नागपूर :- अमरावती मार्ग आणि शंकरनगर येथील 33/11 उपकेंद्रातून वीजपुरवठा होणा-या धरमपेठ भागातील गोकुळपेठ आणि त्रिकोणी पार्क या 11 केव्ही वीज वाहिन्यांवर करावयाच्या अत्यावश्यक दुरुस्ती कामांमुळे बुधवार दि. 23 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळि 7 ते सायंकाळि 5.30 या वेळेत धरमपेठ, खरे टाऊन, आंबेडकरनगर, गिरीपेठ, धरमपेठ, दक्षिण अंबाझरी मार्ग, गोकुळपेठ आणि त्रिकोणी पार्क या भागात वीजपुरवठा खंडित राहील, असे महावितरणतर्फ़े कळविण्यात आले आहे.
या काळात ग्राहकांनी संयम बाळगून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.