संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी तालुक्यातील 10 परीक्षा केंद्रात एकूण 2798 विद्यार्थीपैकी 41 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित
– दहावीचा पहिला पेपर सुरळीत
कामठी:- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी शालांत परीक्षेला आज 2 मार्च पासून सुरुवात झाली ही परीक्षा 2 मार्च ते 25 मार्चदरम्यान कामठी पंचायत समिती केंद्राअंतर्गत येणाऱ्या 10 परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे.आज पहिला पेपर भाषेचा झाला असून या परीक्षेला एकूण दोन हजार सातशे अठ्यांनवं विद्यार्थीपैकी 41 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते.
कामठी तालुक्यात आजपासून सुरू झालेली दहावीची परीक्षा तालुक्यातील दहा परीक्षा केंद्रावर घेण्यात येत आहे त्यानुसार कामठी येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट परीक्षा केंद्रावर 307 विद्यार्थी,रामकृष्ण शारदा मिशन परीक्षा केंद्रावर 263 विद्यार्थी,एम एम रब्बानी हायस्कुल 201 विद्यार्थी,खतिजाबाई गर्ल्स हायस्कुल 500 विद्यार्थी,नूतन सरस्वती विद्यालय कामठी 336 विद्यार्थी,प्रकाश हायस्कुल गुमथळा 226 विद्यार्थी, बळीराम दखणे हायस्कुल कन्हान 270 विद्यार्थी बीकेसीपी हायस्कुल कन्हान 250,साईबाबा आदिवासी आश्रम शाळा गोंडेगाव टेकाडी 199 विद्यार्थी तसेच नूतन सरस्वती विद्यालय कान्द्री 246 विद्यार्थी असे एकूण 2798 विद्यार्थी परीक्षेला सहभागी असणे अपेक्षित होते मात्र 41 विद्यार्थी आजच्या पहिल्या भाषा पेपरला अनुपस्थित राहले.आजचा पहिला पेपर सुरळीत पार पडला.