रामदास आठवलेंच्या त्या वक्तव्याचे कामठी शहरात तिव्र पडसाद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

आंबेडकरी जनतेने रामदास आठवलेंच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारून केला निषेध !

कामठी :- केंद्रीय समाजकल्यान राज्यमंञी नाम. रामदास आठवले यांनी ४ ऑक्टोबर च्या पञकार परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसतांना बौद्ध धम्म स्विकारला या वक्तव्याचे तिव्र पडसाद कामठी शहरात उमटले असुन या वक्तव्याचा निषेधार्थ आज दुपारी 12 वाजता कामठी येथील जयस्तंभ चौकात भारतीय संविधान दिन गौरव समिती व इतर संघटनेसह आंबेडकरी जनतेने रामदास आठवलेंच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे चपला जोडे मारून निषेध नोंदविला तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मंत्रीपदावरून बरखास्त करण्यात यावा या मागणीचे आशयाचे सामूहिक निवेदन तहसीलदार मार्फत महामहिम राष्ट्रपती व पंतप्रधानला देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्व संध्येला केंद्रिय राज्यमंञी रामदास आठवले यांनी डॉॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराविषयी अतिषय निंदनिय असे वक्तव्य केले प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आठवले म्हणाले की बाबासाहेंना हिंदु धर्म सोडायचा न्हवता इच्छा नसतांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला हा विषय प्रसारमाध्यमात प्रसारित होताच कामठी येथिल बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या यावर भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी चे माजी अध्यक्ष विजय पाटील व नवनियुक्त अध्यक्ष विकास रंगारी तसेच वंचित बहुजन आघाडी चे पदधिकारी नरेश वाघमारे च्या वतिने समाज बांधवांना एकञित आनुण या वक्तव्याचा निषेध नोंदविण्याची भुमिका घेतली. एके काळी आंबेडकरी विचाराची सिंहगर्जना म्हनुण ओळख असलेल्या रामदास आठवले यांनी सत्तेसह प्रतिगामी विचारसरणींचे मांडलिकत्व स्विकारले असल्याचे दिसुन येत असल्याचे वक्तव्य आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते विजय पाटील यांनी या धिक्कार सभेत व्यक्त केले.तसेच माजी नगरसेवक विकास रंगारी, प्रा दुर्योधन मेश्राम,अर्चना सोमकुवर ,विद्या भीमटे आदींनी या सभेत आपले समयोचित मार्गदर्शन करून रामदास आठवलेच्या त्या वक्तव्याचा निषेध करून निषेधार्थ नारेबाजी करून तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी भारतीय संविधान दिन गौरव समिती कामठी चे माजी अध्यक्ष विजय पाटील, नवनियुक्त अध्यक्ष विकास रंगारी, राजेश ढोके, अनुपचंद कांबळे, मनोहर गणवीर, दुर्योधन मेश्राम, दिपंकर गणवीर, उदास बन्सोड, सुभाष सोमकुवर, नामदेव फकिर्डे, उमाकांत चिमनकर, प्रदीप फुलझेले, अनिल बनकर, नरेश वाघमारे, चंद्रभान मेश्राम, गौतम माटे, नरेश वासनिक, सुरेश गजभिये, विद्या भीमटे, अर्चना सोमकुवर, शेवंता चांदूरकर, सुशीला चव्हाण, सुधा रंगारी, नंदा टेंभरे, विशाखा मेश्राम, रेखा पाटिल, वृंदा मानकर, द्रौपदी गेडाम, हेमलता गेडाम, शीला मेश्राम, रंजीता गजभिये, शालिनी टेंभुर्णीकर, तनुश्री गजभिये आदी उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com