कामठी :- 1 मे रोजी महाराष्ट्र कामगार दिवस व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधून महापुरुषांच्या विचारांचा लोकजागर व्हावा म्हणुन गुरु शिष्य जयंती मेळाव्याचे आयोजन 1 मे रोजी गट ग्राम पंचायत खरसोलीच्या पटांगणामध्ये दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रबोधनकार शाहीर पुरुषोत्तम खांडेकर रा. परसाड ता. कामठी यांचा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार टेकचंद सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षा जि.प. सभापती अवंतिका लेकुरवाळे, सरपंच आशिष चुरड, रोशन खडशे, गिरीश पांडव, धर्मपाल गुडे, अभिलाष बेंदले, सौरभ चुरड, नलू शेंडे, रजनी बावणे, यांच्या उपस्थित कार्यक्रमाचे आयोजन हिरकन्या सांस्कृतिक कला मंडळ खरसोली व ऑरेंज सिटी बहु संस्था विहीरगाव नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व कलावंतांनी संगीतप्रेमी व विचारवंतांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. असे आवाहन संस्थेचे सचिव रोशन बावणे शाहीर कालीचरण शेंडे यांनी केले.
खरसोली येथे गुरु शिष्य मेळाव्याचे आयोजन आज
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com