संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरा बूथ सबसे मजबूत बूथ’ याअंतर्गत देशभरातल्या बुथप्रमुखांशो ऑनलाईन संवाद साधला .या पाश्वरभूमीवर भारतीय जनता पार्टी कामठी विधानसभाच्या वतीने कामठी तालुक्यातील आजनी येथील हनुमान मंदिर सभागृहात मोदी @9 मेरा बूथ सबसे मजबूत बूथ संमेलणाचे आयोजन करण्यात आले होते.हे संमेलन यशस्वीरीत्या पार पडले असून या कार्यक्रमात कामठी मौदा विधानसभा क्षेत्रातील समस्त बूथ प्रमुखासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली होती.
हे संमेलन आमदार टेकचंद सावरकर व भाजप जिल्हा महामंत्री व नागपूर जिल्हा परिषद चे माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान यांच्या मुख्य उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडले असून या संमेलनात उपस्थित समस्त भाजप बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले.यावेळी सन 2024 मध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे सर्व बूथ प्रमुखामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे यापुढे सर्वजण आणखी जोमाने कामाला सुरुवात करतील असा विश्वास भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी यावेळी व्यक्त केला.
हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आमदार टेकचंद सावरकर, भाजप जिल्हा महामंत्री अनिल निधान, उपस्थित समस्त भाजप पदाधिकारी,कार्यकर्तेगण तसेच शक्ती केंद्रप्रमुख,बूथ प्रमुख विस्तारक आदींनी मोलाची भूमिका साकारली.