नागपूर :- बामसेफ, बीआरसी, डीएस-फोर व बीएसपी चे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचा 17 वा स्मृतिदिन आज 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.30 वाजता नागपुरातील मान्यवर कांशीराम मार्गावरील बसपाच्या विभागीय कार्यालयात संपन्न होत आहे.
कही हम भूल न जाये या बसपाच्या राष्ट्रीय अभियानाचे जनक मान्यवर कांशीराम यांचाच स्मृतिदिन याच अभियानांतर्गत त्यांच्याच कार्यालयात होणार असल्याने बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन बसपाचे प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.