नागपूर :- भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका व सावित्रीबाईंच्या सहकारी फातिमा शेख यांचा आज 9 आक्टोंबर रोजी 124 वा स्मृतिदिन आहे. तसेच बामसेफ, बीआरसी, डी एस-फोर व बहुजन समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांचाही 9 ऑक्टोबर रोजी 18 वा स्मृतिदिन आहे.
बसपाच्या कही हम भूल न जाये या राष्ट्रीय अभियानांतर्गत आज बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नागपुरातील बसपा चे कांशीराम मार्गावरील मुख्यालय बहुजन भवन येथे या दोन्ही महापुरुषांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम होत आहे.
बसपाचे प्रदेश, जिल्हा, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या हितचिंतकांनी या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केले आहे.