नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रा आज (रविवार, दि. ७ एप्रिल २०२४) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दक्षिण-पश्चिम मतदारसंघात पोहोचणार आहे. सहकारनगर (पुराणिक चौक) येथून सायंकाळी ६.३० वाजता यात्रेला प्रारंभ होईल. त्यानंतर गजानन धाम, शामनगर वस्ती, स्वागत सोसायटी, सोनेगाव तलाव रोड, एचबी इस्टेट, समर्थ नगरी, सोनेगाव वस्ती, शिव विहार कॉलनी मेन रोड, त्रिशरण बुद्ध विहार एकात्मता नगर, जयताळा गणेश मंदिर, रमाबाई आंबेडकर नगर, जयताळा मुख्य चौक, गाडगे नगर, रेणुका माता मंदिर, जुना हिंगणा नाका, वासुदेव नगर या मार्गाने हिंगणा रोड टी-पॉईंट येथे लोकसंवाद यात्रेचा समारोप होईल.