कन्हान :- श्री हनुमान व श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर बखारी येथे अखंड हरिनाम संकीर्तन काकड आरती सप्ताहाची बुधवार (दि.२०) ला सुरूवात होऊन दर रोज पहाटे काकडा, गाथा भजन, पारायण, हरिपाठ, हरि किर्तन आणि हरि जागर करून आज बुधवार (दि. २७) नोहेंबर ला पालखी, दिंडी सोहळा व गोपाल काल्याचे किर्तनांतर महाप्रसाद वितरण करून सांगता करण्यात येईल.
सकळांसी येथे आहे अधिकार ।
कलियुगी उद्धार हरीच्या नामे ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा ।
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ॥
दरवर्षी प्रमाणे यावर्षी काकड आरती निमित्त अखंड हरीनाम संकीर्तन सप्ताह सोहळयाची बुधवार (दि.२०) नोहेंबर २०२४ ला सुरूवात करण्यात आली. दररोज पहाटे सकाळी ५ ते ६ वाजता काकडा, १० ते १२ वा. गाथा भजन पारायण, सायंकाळी ६ ते ७ वा. हरिपाठ, रात्री ८ ते ११ वा. हरिकिर्तना नंतर हरि जागर करण्यात येईल. गुरूवार (दि.२१) सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ सांप्रदायिक करून रात्री ९ ते १२ वा. वारकरी भजन मंडळ व वारकरी महिला भजन मंडळ बखारी यांचा भजन करण्यात आले. शुक्रवार (दि.२२) ला हरि पाठा नंतर ह.भ.प.छत्रपती महाराज कुहीटे मु. पालोरा यांचे किर्तन झाले. शनिवार (दि.२३) ला सायं.६ ते ७ वा.नंतर जय दुर्गा भजन मंडळ मेहंदी यांचे भजन कर ण्यात आले. रविवार (दि.२४) ला सायं.६ ते ७ वा. हरि पाठा नंतर श्रीकृष्ण भजन मंडळ बखारीच्या संगिता वर अखिल भारतीय धर्मोपदेशक ह.भ.प. सुखदेव महाराज उरकुले श्री क्षेत्र आंभोरा यांचे कीर्तनाने श्रौते मंत्रमुग्ध झाले. सोमवार (दि.२५) ला सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ नंतर वारकरी भजन मंडळ पिपळा च्या तालावर ह.भ.प. भिमराव महाराज कडु खंडाळा यांचे भारुडाने जनजागृती करण्यात आली.
मंगळवार (दि.२६) ला सायं. ६ ते ७ वा. हरिपाठ, ८ ते १० वा. ह. भ.प.लीना बागले मु. शहापुर जि. भंडारा व भजन मंडळ रामाकोना (म.प्र.) संचासह किर्तन केले. तंदनंतर वारकरी भजन मंडळ गरंडा यांचा जागृतीपर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात भाविक भक्तांनी हरिनामाचा मनसोक्त आनंद लुटला.
आज बुधवार (दि.२७) ला सकाळी ८ ते ११ पालखी, दिंडी व मिरवणुक सोहळा, दुपारी १२ ते २ ह.भ.प. विनोदाचार्य पांडुरंग महाराज मुरुमकर बनगाव ता.जि. पांढुर्णा (म.प्र.) यांचे गोपाल काल्याचे कीर्तन करून महाप्रसाद वितरण करून अखंड हरिनाम संकीर्तन काकड आरती सप्ताहाची सांगता करण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता श्री हनुमान आणि श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर कमेटी सह समस्थ गावकरी मंडळी बखारी सहकार्य करित आहे.