नागपूर – सुधार प्रन्यासाअंतर्गत रामेश्वरी परिसरात येणाऱ्या खसरा क्र. ५१/१, ५१/२, मौजा बाबुळखेडा, काशीनगर, नागपूर येथील शेकडो भूखंडधारक अनेकवर्षांपासून भूखंड नियमीतीकरणाची मागणी करीत आहे. मा. हायकोर्टाने सदर भूखंडाचे नियमितीकरण 2 महिन्यात करण्याबाबत आदेश दिले. मात्र, नासुप्र अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करून गेल्या 8 महिन्यापासून प्रकरणाला हेतूपुरस्पर प्रलंबित ठेवेले. अश्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भूपेंद्र (गोलू) बोरकर यांनी केली. यासंदर्भात पीडित भूखंडधारक तसेच भाजयुमोच्या शिष्टमंळाने नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी तसेच नासुप्र विश्वस्त संदीप इटकेलवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डाॅ. मधुकर मून, सुमीत मानकर, यश चौधरी, अमित ठाकूर, पकज जोशी आदिंची उपस्थिती होती. भूखंड प्रकरणाच्या नियमितीकरणाला मार्गी लावा अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराद्वारे प्रकरण गांभीर्याने घेतले जाईल तसेच जनआंदोलन उभारण्यात येणार असा इशाराही भूपेंद्र (गोलू) बोरकर यांनी दिला.
भाजयुमोचे भूपेंद्र (गोलू) बोरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या निवेदनात सांगितले की, खसरा क्रमांक – ५१/१, ५१/२, मौजा बाबुळखेडा, काशीनगर, नागपूर येथील शेकडो भूखंडधारक अनेक वर्षांपासून भूखंड नियमीतीकरणाची मागणी करीत आहे. परंतू, आतापर्यंत नियमीतीकरण करण्यात आले नाही. सदर जागेवर व्हेजीटेबल मार्केट व स्टेट ट्रांसपोर्टचे विकास योजनेत आरक्षण असून या आरक्षण संबंधीत कार्यालयांना नाहरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले आहे. यानंतर नागपूर महानगर पालिका कार्यालयाने मौक्यावर खुली असलेली जागा टीडीआर (TDR) देवून आपल्या ताब्यात घेवून सूरक्षा भिंतीचे (कंम्पाउंड वॉल) बांधकाम केले आहे. तसेच नागपूर महानगर पालिका आयुक्त यांचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) देण्यात आले आहे. तसेच स्टेट ट्रान्सपोर्ट कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त झाले आहे. मा. उच्च न्यायालयाने W.P. NO. 5483/2019 या प्रकरणात भुखंडाचे नियमीतीकरण 2 महिन्यात करण्याबाबत आदेश दिले आहे. परंतु, नासुप्र (NIT) कार्यालयाने न्यायालयीन निर्णयाबाबत नासुप्र कार्यालयातील विधी अधिकारी यांचा अभिप्राय घेण्यात आला असून त्या अभिप्राय प्रमाणे भुखंडाचे नियमीत करण्यात कोणतीच अडचण नसल्याचे कळविण्यात आले. मात्र, सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करुन सदर प्रकरण कश्याप्रकारे रेंगाळल्या जाईल. तसेच गेल्या 8 महिन्यापासून कोणतीच कार्यवाही उपरोक्त प्रकरणात अधिकाऱ्यांकडून करण्यात आली नाही, असेही बोरकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून सांगितले.
नासुप्रने सदर भुखंडाचे मागणीपत्र देवून नियमितीकरण लवकरात लवकर करावे, अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहराद्वारे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही भूपेंद्र (गोलू) बोरकर यांनी दिली. यावेळी नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी तसेच नासुप्र विश्वस्त संदीप इटकेलवार यांनी उपरोक्त विषयाचा लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असे आश्वासनही शिष्टमंडळाला दिले.
हायकार्टाच्या निर्णयाला तिलांजली देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
मौजा बाबुळखेडा, काशीनगरातील भूखंडाच्या नियमितीकरणाला मार्गी लावा
भारतीय जनता युवा मोर्चाचे नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशींना निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com