डॉ.पी.अनबलगन यांची कोराडी-खापरखेडा वीज केंद्रास भेट
कोराडी संच क्रमांक ६ चा मेरिट ऑर्डर डिसपॅच मध्ये महानिर्मितीमध्ये सर्वात कमी वीज दर(रु.३.१३) भारांक १०० टक्क्यांपेक्षा जास्त
कोराडी :- स्पर्धेत टिकण्यासाठी स्वस्त दरात वीज उत्पादन आणि कार्यक्षमता वाढवावी लागेल. वीज उत्पादनाच्या प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित करून अतिशय नियोजनबद्ध व्यावसायिक पद्धतीने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.पी.अनबलगन यांनी केले. ३x६६० मेगावाट क्षमतेच्या कोराडी वीज केंद्र सभागृहात आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. महानिर्मितीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ.पी.अनबलगन यांनी नागपूर दौऱ्यात कोराडी-खापरखेडा वीज केंद्राचा दौरा करून वीज उत्पादनाशी निगडित सर्व घटकांवर जसे कोळसा, एफ.जी.डी. राख, पाणी, वीज उत्पादन कार्यक्षमता वाढविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली व प्रत्येकाने गंभीरतेने योगदान वाढवणे गरजेचे असल्याचे स्पष्ट निर्देश दिले.
प्रारंभी त्यांनी कोराडी ३x६६० मेगावाट मॉडेल चे निरीक्षण केले त्यानंतर संच क्रमांक ८ व ९ तसेच खापरखेडा संच ५ नियंत्रण कक्ष व वॅगन टिपलरला भेट दिली. कोराडी प्रशिक्षण केंद्र, अत्याधुनिक पूर्णतः एकत्रित सुरक्षा प्रणालीची त्यांनी पाहणी केली तसेच कोळसा पाईप कन्व्हेयर प्रकल्पाला भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
दौऱ्यात संचालक(संचलन व प्रकल्प) संजय मारुडकर, कार्यकारी संचालक पंकज सपाटे, डॉ.नितीन वाघ, राजेश पाटील, मुख्य अभियंते अभय हरणे, राजू घुगे, राजेश कराडे, नारायण राठोड, शरद भगत, उप मुख्य अभियंते विराज चौधरी, प्रफुल्ल कुटेमाटे, अरुण पेटकर, डॉ.अनिल काठोये, जितेंद्र टेम्भरे, विजय बारंगे, शिरीष वाठ, विलास मोटघरे, महाव्यवस्थापक(वित्त व लेखा) तृप्ती मुधोळकर, अधीक्षक अभियंते, विभाग प्रमुख तसेच संबंधित एजन्सीजचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.