– डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.
नागपूर :- निवडणूका या केवळ सत्ता काबीज करण्यासाठीच असतात असे नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, पण मनुवादी राजकीय पक्षांनी आतापर्यंत बहुजन समाजाच्या मतांवर सत्ता संपादन करून त्यांचे शोषण केले, सामाजिक विषमता आर्थिक विषमता, शैक्षणिक विषमता कायम ठेवली म्हणून या विषमतेच्या विरोधात फुले-आंबेडकरी चळवळ गतीमान करण्याची गरज आहे, भाजपा-काँग्रेस फुले-आंबेडकरी चळवळ वाढू देत नाही, ती वाढवणार नाही म्हणून चळवळी साठी बीआरएसपी निवडणूकीच्या मैदानात आहे असे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अँड.डॉ.सुरेश माने यांनी केले.
डॉ. सुरेश माने नागपूर लोकसभा क्षेत्रातील उमेदवार विशेष फुटाणे आणि रामटेक क्षेत्रातील बीआरएसपीचे उमेदवार ऍड. भीमराव शेन्डे यांच्या प्रचारार्थ कमाल चौक येथे आयोजीत जाहीर सभेत बोलत होते. याप्रसंगी दोन्ही उमेदवारांनी आपली भुमिका मतदारांसमोर मांडून मतदानासाठी आवाहन केले, याप्रसंगी राष्ट्रीय उपाध्क्ष रमेश पाटील, पंजाबराव मेश्राम, सी.टी.बोरकर यांचीही भाषणे झाली. प्रा.मंगला पाटील, यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर डॉ. विनोद रंगारी यांनी आभार व्यक्त केले.