अमरदिप बडगे
गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा उडान पुलाचे कार्य सुरू असुन अपुऱ्या सुविधामुळे ठेकेदार लोकांच्या जिवा सोबत खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार दिसुन येत आहे.
खैरलांजी रोड गौतम बुद्ध वॉर्ड गेट न. 520 येथे उडानपूल कार्याला सुरवात झाली असून ते काम एका ठेकेदार करित आहे. एप्रिल महिन्या पासून उडान पुलाचे कार्य सुरु असुन सूचना फलक कुठे ही लावले गेले नाही, रस्ते तोडले पण दुसरे कोणते पर्याय मार्ग दिले नाहीत तसेच नाल्या तोडल्या गेल्या आहेत. परंतु सांड पाण्याची चे विलेवाट करिता कोणतीही योजना नाही. या वॉर्डातील लोकांची समस्या असुन त्यांचे जाणे येणाचे मार्ग सुद्धा बंद करून ठेवल्याचे दिसत आहे. रस्त्यावर माती जमा होऊन मोठा अपघात घडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ऐन पावसाचे दिवस असुन या मार्गावर नेहमीच्या येणा-या जाण्याची वर्दळ सुरू असते. अशा वेळी अपघात होण्याचे सुध्दा दाट शक्यता असल्यानचे नागरिकांचे म्हणणे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या उपकरणाचे खूप अभाव दिसून येत आहे,याकडे संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष दिले पाहिजे. अन्यथा मोठा अपघात होऊन हानी होऊ शकते .