डेन्मार्क संसदेच्या तीन उपाध्यक्ष्यांनी घेतली राज्यपालांची भेट 

मुंबई :- डेन्मार्क संसदेचे तीन उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन, जेप्पे सो व करीना ऍड्सबोल यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

भारत – डेन्मार्क राजनैयिक संबंध स्थापनेस ७५ वर्षे पूर्ण झाली असून उभय देशांमध्ये संसदीय सहकार्य, व्यापार, हरित ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने भेटीचे आयोजन केले असल्याचे उपाध्यक्ष लिफ लान जेन्सेन यांनी राज्यपालांना सांगितले.

डेन्मार्कची लोकसंख्या अतिशय कमी असून आपल्या देशाला भारताकडून कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन यांनी यावेळी सांगितले. या संदर्भात भारताशी स्थलांतर करार देखील केला असल्याचे त्यांनी सांगितले.

डेन्मार्क भारताचा महत्वाचा व्यापारी भागीदार असून डेन्मार्कच्या लार्सन अँड टुब्रो व मर्स्क कंपन्यांची नावे भारतात सर्वतोमुखी आहेत. डेन्मार्कने भारताला कौशल्य विकास, दुग्ध क्रांती, स्वच्छ ऊर्जा, शिक्षण व सांस्कृतिक सहकार्य क्षेत्रात सहकार्य केल्यास त्याचे स्वागतच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचा कुलपती या नात्याने राज्य तसेच डेन्मार्क मधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, शिक्षक व सत्र देवाणघेवाण झाल्यास त्याचा उभयपक्षी विद्यार्थ्यांना फायदा होईल असे राज्यपालांनी सांगितले. बैठकीला डेन्मार्क संसदेचे वरिष्ठ अधिकारी व डेन्मार्कचे मुंबईतील उप वाणिज्यदूत हेन्री करकाडा प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'दिलखुलास' आणि 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त' उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत

Sat Mar 9 , 2024
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त’ भारतीय वन सेवेतील महिला अधिकारी आणि कांदळवन कक्ष, मुंबईच्या उपवनसंरक्षक अनिता पाटील यांची मुलाखत मुलाखत प्रसारित होणार आहे. जगभरात दरवर्षी 8 मार्च हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनानिमित्त भारतीय वन सेवेतील कांदळवन कक्ष, मुंबईच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!