– अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात सन्मान
अमरावती :- उन्हाळी-२०२२ अभियांत्रिकी व तांत्रिकी परिक्षेच्या गुणवत्ता यादीत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील केमिकल टेक्नालॉजी विभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी प्रथम स्थान पटकावले. अभियांत्रिकी व तांत्रिकी शाखेतून रासायनिक तंत्रशास्त्र विभागाचे गुणवत्ताप्राप्त तीन विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहेत. दरवर्षी अभियांत्रिकी व तांत्रिकीच्या विविध चार शाखांतून प्रथम आणि प्रत्येक शाखांमधून गुणवत्ताप्राप्त एक अशा विद्यार्थ्यांना स्व. श्री वसंतराव पालेकर स्मृती सुवर्णपदक (फूड टेक), स्व.देवकरणजी भूत स्मृती सुवर्णपदक (ऑईल अंन्ड पेन्ट) व पुष्पाबाई कमल किशोर अग्रवाल सुवर्णपदक (पेट्रो केमिकल टेक) सुवर्णपदकाने गौरविले जाते.
त्यानुसार यंदा साक्षी प्रमोद उखळकर (फूड टेक), वैभव किशोर भामरे (ऑईल अंन्ड पेन्ट), नुपूर किरण शिरपूरकर (पेट्रोकेमिकल टेक) या विद्यार्थ्यांना सुवर्णपदकाने विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या ३९ वा दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या गुणवंतांचे विभागप्रमुख डॉ. ए.बी.नाईक, डॉ. एन.बी सेलूकर, डॉ. पी.के. वानखडे, डॉ. पी.बी. शिंगवेकर, ए. एल. राठोड, डॉ. एम.बी. कुंभारे व सर्व शिक्षकेत्तर वर्गानी त्यांचे अभिनंदन केले आहे.