होमगार्ड आशिष पाटील हत्येचे तीन आरोपी अटक 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– स्थागुशा व कन्हान पोलीसानी ३ आरोपीस अरोली रेणुका बार मध्ये दारू पिताना पकडले

कन्हान :- अनैतिक संबंधाच्या संशयातुन होमगार्ड आशिष पाटील या युवकाची आरोपींनी हॉकी स्टिकने प्रहार व धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या करून चारचाकी वाहनात टाकुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मध्य प्रदेशातील कटंगी ता. तिरोडी पोस्टे अंतर्गत फेकुन चारचाकी वाहन सोडुन फरार तिन्ही आरोपीना स्थागुशानाग्रा पथक व कन्हान पोलीसानी अरोली येथील रेणुका बार मध्ये दारू पिता ना पकडले.न्यायालयाने पोलीसाना आरोपीचा सहा दिवसाचा पीसीआर दिला आहे.

होमगार्ड आशिष उर्फ सोनु दिलीप पाटील वय २७ वर्ष राह. न्यु गोंडेगाव पुनर्वसन वसाहत असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असुन मुख्य आरोपी कुणाल राजेश नाईक वय ३१ वर्ष व साथीदार सुमित नागोराव गजभिये वय ३५ वर्ष आणि आशिष उर्फ डांगा महेश नागदेवे वय २९ वर्ष सर्व राह. न्यु गोंडेगाव पुनर्वसन अशी आरोपींची नावे आहे. ही हत्येची थरारक घटना मंगळवार (दि.१०) ऑक्टोंबर ला दुपारी कन्हान हद्दीत नागपुर बॉयपास चारपदरी महामार्गवर बोरडा चौरस्ता जवळील बस स्टापवर घडली. घटनेचा पर्दाफाश होताच चांगलीच खळबळ उडाली.

आरोपी कुणाल नाईक व मृतक न्य गोंडेगाव येथे जवळपास राहत असुन मृतक आशिष हा पारशिवनी येथुन होमगार्ड ची रात्रपाळी ड्युटी करून सकाळी घरी आल्यावर कृणाल नाईक ने आशिष ला नागपुर जबलपुर चारपदरी महामार्ग क्र. ४४ वरील बोरडा चौरस्ता बस स्टॉपवर बोलावुन घेतले. यावेळी शाब्दिक वाद झाला आणि काही कळण्या पुर्वीच आरोपींनी हॉकी स्टिकने प्रहार व धारदार शस्त्रा ने वार करून आशिषची हत्या केली. त्यानंतर मृतदेहा ची चारचाकी वाहना द्वारे मध्यप्रदेशातील तह. कटंगी जि. बालाघाट तिरोडी पोलीस स्टेशन हद्दीत कार क्र. एमएच ३१ सीएन ६२४० रस्त्यात दोन्ही चाके पंचर झाल्याने तेथेच जमिनीवर मुतदेह टाकला. घटनेची तेथील पोलिसांना माहिती होताच आरोपींनी रक्ताने माखलेले चारचाकी वाहन सोडुन पसार झाल्याने पोलीसाना मुतदेह कन्हान पोस्टे अंतर्गत असल्याने कन्हान पोलीसाना माहिती दिल्याने कन्हान पोलीस पथक व नातेवाईक घटनास्थळी पोहचुन ओळख पटल्याने कन्हान पोलिस व स्थागुशा नागपुर ग्रामिण पथक रस्त्यावरील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन पाहत ही कारवाई करित असताना गुरूवार (दि.१२) ला तिन्ही आरोपीना स्थागुशानाग्रा पथक व कन्हान पोलीसानी अरोली येथील रेणुका बार मध्ये दारू पिता ना पकडुन कन्हान पोस्टे ला आणले.

मध्य प्रदेश येथी ल तिरोडी पोलीसानी घटनेचा गुन्हा नोंद करून शुक्र वार (दि.१३) ला हत्येच प्रकरण कन्हान पोलीसाच्या स्वाधिन केल्याने कन्हान पोलीसांनी तिन्ही आरोपीना न्यायालयात हजर केल्याने हत्येचा पुढील सखोल तपासा करिता न्यायालयाने तिन्ही आरोपीचा कन्हान पोलीसाना सहा दिवसाचा म्हणजे (दि.१८) ऑक्टोंबर पर्यंत पीसीआर दिला आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामिण हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर यांचे मार्गदर्श नात स्थानिक गुन्हे शाखा ना. ग्रा. पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे, कन्हान पोलीस वरिष्ट निरिक्षक सार्थक नेहेते, सपोनि सी बी चव्हाण, एएसआय खुशाल रामटेके, जयलाल सहारे मुद्दसर जमाल, अमोल नागरे, अश्विन गजभिये, हरिष सोनभद्रे, नविन पाटील सह स्थागुशा नागपुर ग्रामिण पथक पोउप निरिक्षक बट्टूलाल पांडे, एएसआय नाना राऊत, हेकॉ विनोद काळे, गजु चौधरी, ईकबाल शेख, अरविंद भगत, प्रमो द भोयर, संजय बरोदीया, नापोशि विरु नरड, राकेश तालेवार, चालक मोनु शुक्ला आदीनी शिताफितीने करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM arrives in Mumbai; to inaugurate session of IOC

Sun Oct 15 , 2023
Mumbai :-Prime Minister Narendra Modi arrived in Mumbai today for a one-day visit on Sat (14 Oct). Maharashtra Governor Ramesh Bais, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Deputy Chief Minister Ajit Pawar welcomed the Prime Minister. The Prime Minister is scheduled to inaugurate the 141st session of the International Olympic Committee at Jio World Center in Mumbai. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com