खापरखेडा :- अंतर्गत मौजा सिल्लेवाडा कॉलनी ०३ किमी पश्चिम, दिनांक २१/०७/२३ चे २२/०० वा. यातील फिर्यादी हा महामृत्युंजय कार्यक्रमा करिता गेला असता, कार्यक्रम आटोपून घरी जात असता, यातील नमुद आरोपी यांनी संगनमत करून जुन्या वादाचे कारणावरून झगडा भांडण करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
सदर प्रकरणी फिर्यादी नामे संतोष किशन बहुरिया वय ३० वर्ष रा चांदनी चौक सिल्लेवाडा यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. खापरखेडा येथे आरोपी नामे १) अंकीत यादव २) ईमरान खान ३) बच्चा कुरील ४) विशाल यादव ५) आकाश ठाकुर ६) अमितसिंग ७) नथ्थु प्रजापती ८) गुडडु शाहु ९) राजन सिंग १०) फारूख खान ११) रामफल प्रसाद सर्व रा. सिल्लेवाडा यांचे विरुद्ध कलम १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि राजेश पिसे पो स्टे खापरखेडा हे करीत आहे.