दीक्षाभूमीवर अहोरात्र सेवा देणारे हजारो सफाई कर्मचारी सोयी सुविधे पासुन वंचीत.. नागपुर जिल्हा महानगर पालिका कामगार संघटनेचा आरोप

नागपूर :- दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठया उत्साहात साजरा केला जाणार आहे..यानिमित्त दीक्षाभूमी व दीक्षाभूमी परिसरात सुमारे दीड हजार सफाई कर्मचारी आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत असतात. परंतु महानगर पालिकेतर्फे या सफाई कर्मचाऱ्यांना कोणतेही आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यात येत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागपूर महानगर पालिके तर्फे या सर्व सफाई कामगारांना कार्यालयाचा गणवेश, हातांची दस्ताने, मास्क, सह आवश्यक सुख सुविधा देण्यात यावे..तसेच त्यांना कामाचा ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी , पोटभर जेवण, नाष्टा, आरोग्य सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गेले 6,7 दिवस अहोरात्र कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 1 दिवसाची रजा किंवा 1 दिवसाचा पगार प्रोत्साहन भत्ता म्हणून जाहीर करावा. अशी आग्रही मागणी नागपुर जिल्हा महानगर पालिका कामगार संघटनेचे अध्यक्ष अँड. राहुल झांबरे, उपाध्यक्ष आशिष पाटिल,महासचिव लोकेश मेश्राम, न्यायिक सल्लागार भोला खोब्रागडे यांच्यासह महापालिकेतील शेकडो कर्मचाऱ्यांनी आज महापालिका अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांना भेटून केली आहे. कामगार संघटनेचा शिष्टमंडळाशी चर्चा करुन अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांनी सफाई कर्मचाऱ्यांना एक दिवसाची साप्ताहिक रजा देण्याचे मान्य केले आहे तसेच सफाई कर्मचाऱ्यांना हाताचे दस्तक, गणवेश, मास्क, सेनिटायझर देण्याचे मान्य करुन कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधां देणार असल्याचे कबूल केले. संघटनेचे अध्यक्ष अँड राहुल झांबरे यांनी नागपुर महापालिकेतील सफाई कामगारांच्या इतर आवश्यक मागणीला मनपा आयुक्तांनी न्याय द्यावा आणि जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी उचित कार्यवाही करावी. अन्यथा पुढील वर्षी साजरा होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्याचा पूर्वतयारीवर सफाई कर्मचारी बहिष्कार टाकेल..असा इशाराही यावेळी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तीर्थ दर्शन योजना : 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्या येथे जाणार

Fri Oct 11 , 2024
Ø पालकमंत्र्यांच्या बैठकीत दर्शनास मान्यता Ø कळंब येथून होणार तीर्थ दर्शनाची सुरुवात यवतमाळ :- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य व राज्याबाहेरील तीर्थ क्षेत्रांना भेटू देऊन दर्शन घेता यावे, यासाठी शासनाने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 जेष्ठ नागरिकांना अयोध्या येथे दर्शनाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लाभार्थ्यांना दर्शनासाठी मान्यता देण्यात आली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com