राज्य नाट्य हौशी मराठी स्पर्धेत यंदा 22 नाटकांचे प्रयोग 30 नोव्हेंबर पासून प्रारंभ

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय च्यावतीने घेण्यात येणाऱ्या 62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नागपूर विभागीय फेरीला 30 नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार होत आहे. 21 डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार असून एकूण 22 नाटके सादर केली जातील. सिविल लाईन येथील डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

30 नोव्हेंबर पासून विभागीय फेरीला प्रारंभ होत आहे. नागपूर केंद्रावर सादर होणाऱ्या नाटकांची वेळापत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी प्रसिद्ध केले आहे. दररोज सायंकाळी ७ वाजता प्रत्येक एक नाटक नाट्य रसिकांसाठी बघायला मिळणार आहे . डॉ. पिनाक गंगाधर दंदे सामाजिक संस्थेच्या ” दी फियर फॅक्टर या नाटकाने सुरुवात होणार आहे. नागपूरच्या नाट्य संस्थासह इंदूर येथील मध्य प्रदेश, मराठी अकादमी राष्ट्र तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ललित कला विभाग कोराडी औष्णिक विद्युत केंद्र याचीही नाटके या स्पर्धेत नागपूर केंद्रावर सादर केली जाणार असल्याची माहिती श्रीराम पांडे (मुंबई) यांनी दिली आहे. आणि नागपूर केंद्र समन्वयक मंजुश्री डोंगरे यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

"धूमधाम से मनाई गई खुशीयों की बौछार, रोकड़े ज्वेलर्स के ग्राहको ने जीता 25ग्राम का सोने का सिक्का इंडिया ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवल में"

Fri Nov 24 , 2023
नागपूर :- जीजेसी द्वारा प्रस्तुत भारत का सबसे बड़ा शॉपिंग फेस्टिवल इंडिया ज्वेलरी शॉपिंग फेस्टिवल “आब चमकेगी सबकी किस्मत” में रोकड़े ज्वेलर्स ने त्योहारों में सुनहरी चमक जोड़ दी,सौभाग्य की बात यह है की फेस्टिवल के तहत घोषित लक्की ड्रा की घोषणा मे विदर्भ के सर्वप्रथम २५-२५ ग्राम सोने के सिक्के जीतने वाले पहले सौभाग्यशाली विजेता बने श्रीमती. अनिता श्याम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com