संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 16 :- जुनी पेन्शन लागू करा या मुख्य मागणीला घेऊन कर्मचारी संघटनांकडून 14 मार्च पासून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला कामठी तालुक्यातील कर्मचारी संघटनांनी पाठींबा देत बेमुद्दत संपात सहभाग नोंदविला .आज या बेमुद्दत संपाचा तिसरा दिवस असूनही संप कायम आहे ज्यामुळे शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प पडले आहेत.कार्यालयात कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे कार्यालयाचे उघडे दार आणि रिक्त पडलेले टेबल खुर्च्या असे सामसूम वातावरण दिसून येत आहे तर दुसरीकडे कामठी तालुक्यातील काही कार्यालयात कंत्राटी कर्मचारी सेवा पुरवित आहेत.
जोपर्यंत राज्य शासन मागणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार अशी अटळ भूमिका कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आले आहे ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकही अडचणीत अडकले आहेत.