राजेंद्र बागडे,तालुका प्रतिनिधी
नरखेड :- राममंदिराच्या चोरीच्या माध्यमातून मधात आलेली अडसर महिला हिचा खून करण्यात आलेला चोरट्याना पकडून पोलिसांना मात्र मोठे यश आले असले तरी मात्र चोरट्याचा थाम थांबला नाही.पंधरा दिवसाने ही चोरट्याची दुसरी घटना घडली. दि. 2 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या दरम्यान मोवाड बस स्थानक परिसरातील असलेला पहिलवान शहा बाबा दरबार मधील दानपेटी चोरट्यानी तोडून त्यामधील दान स्वरूपात आलेली रक्कम अंदाजे 14 ते 15 हजार रुपये कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले. प्रेम खडसे राहणार मोवाड यांच्या तोंडी रिपोर्ट वरून मोवाड पोलीस चौकी येथे कलम 379 भा.द. वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला अधिक तपास मोवाड पोलीस चौकीचे इन्चार्ज प्रेमराज सनेचर, पोलीस शिपाई गणेश ताजने, करित आहे.