पुढे धोका आहे पण आता मोका आहे…

मुंबई – राज्यातल्या शासनाला मतदारांना सरकारला शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांना नेत्यांना आमदारांना खासदसरांना मंत्र्यांना राज्य मंत्र्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना थोडक्यात या राज्याच्या विकास प्रक्रियेत जे जे सामील आहेत गुंतलेले असतात सामील असतात किंवा होतात त्या साऱ्यांना आधी उत्तम संस्कार देऊन त्यांच्या मनात उत्तमोत्तम विचार रुजवून हा महाराष्ट्र सुवळणावर सुमार्गावर आणायचे हे स्वप्न जसे फार पूर्वी यशवंतराव चव्हाण किंवा शंकरराव चव्हाण यांनी बघितले होते ते तसे स्वप्न फक्त आणि फक्त अलिकडल्या काळात बघणारा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यांच्या वागण्या बोलण्याचे निर्णय घेण्याचे शासन चालविण्याच्या पद्धतीचे बारीक सारीक निरीक्षण मी सतत आणि अगदी जवळून करत होतो, त्यांना वास्तवात, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडांना, हा संघ विचार या राज्यातल्या जनतेमध्ये रुजवायचा होता, दुर्दैवाने जसे शंकरराव किंवा यशवंतराव जसे आपल्यातून निघून स्वर्गस्थ झाले तेच पुन्हा पण जरा वेगळ्या पद्धतीने घडणार आहे म्हणजे लढणार्या घडविणार्या घडवू पाहणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या पक्ष श्रेष्ठींनी वर दिल्लीत उचलून घेण्याचे जवळपास निश्चित केलेले आहे आणि येथे याच भाजपा श्रेष्ठींना त्या एकनाथ शिंदे या म्हणाल तर ग्रामीण म्हणाल तर सुरुवातीपासून शहरात वाढलेल्या घडलेल्या एकनाथ शिंदे या मराठा चेहऱ्याला भाजपामध्ये प्रवेश करवून त्यांना पुढल्या महत्वाच्या निवडणुका जिंकून घेण्यासाठी पुढे करायचे आहे, थोडक्यात भाजपाला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात जसा ओबिसि चेहरा गावला आहे त्या भाजपा श्रेष्ठींना हा असाच लोकमान्य लोकप्रिय मराठा चेहरा त्यांची गरज होती आणि एकनाथ शिंदे यांच्या रूपाने त्यांचा हा गेम त्यांनाच दृष्टिक्षेपात आल्याने आपसूकच शिंदे यांना वेळोवेळी काहीसे अडसर वाट्णारे देवेंद्र फडणवीस यापुढे कोणत्याही क्षणी त्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात तुम्हाला एक मंत्री म्हणून बघावे लागणार आहेत, थोडक्यात या राज्यातली. भाजपाची ताकद वाढविण्यासाठी जरी यापुढे एकनाथ शिंदे कायमस्वरूपी जरी तुम्हाला राज्याचे भाजपा नेतृत्व करतांना दिसणार असले तरी देवेंद्र फडणवीस यांची येथली उचलबांगडी मराठी मतदारांच्या दृष्टीने नक्की फार मोठे नुकसान करणारी ठरणार आहे…

जो वाईट प्रकार आपल्या या राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागलेला आहे त्यावर वचक बसविण्याचा नजीकच्या भविष्यात फडणवीस यांचा मोठा इरादा हेतू उद्देश होता ते तसे स्वप्न त्यांनी बघितले होते त्यादृष्टीने ते त्या कामाला नक्की लागणार होते म्हणजे अलीकडले या राज्यातले सत्तेतले किंवा निवडून येणारे नेते, वेळोवेळी या राज्यातल्या विविध प्रत्येक सरकारी कार्यालयातील शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा महत्वाच्या मोक्याच्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जी अमाप समाप कमाईची कामे करवून घेतात, त्या त्या क्षणी या नेत्यांना मंत्र्यांना जरी ते सुखद वाटत असले तरी हेच सरकारी अधिकारी त्यांच्या या बोगस कामांच्या विविध फाईल्स ची एक प्रत स्वतःकडे ठेवून भविष्यात स्वतःचे पोस्टिंग किंवा मलिद्याच्या स्वतःच्या फाईल्स क्लिअर करवून घेण्यासाठी सत्तेत येणाऱ्या बसणार्या नेत्यांना प्रसंगी ब्लॅक मेल करून अति प्रचंड वर कमाई हे असे जवळपास सारेच सरकारी अधिकारी त्यात गुंतले आहेत आणि नेमका हाच प्रकार राज्याच्या हिताच्या दृष्टीने मोठा घातक असल्याचा जेव्हा हे फडणवीसांच्या लक्षात आले त्यांनी ठरविले होते कि एकदा का ते सत्तेत स्थिर झाले कि या अशा बहुसंख्य झारीतले शुक्राचार्याना वठणीवर आणण्याचे मोठे काम आपण हाती घ्यायचे आहे पण त्याआधीच माझ्या कानावर हि बातमी येऊन पडली आहे कि फडणवीस लवकरच आपल्या या राज्याला सोडून केंद्रात त्यांची नियुक्ती होणार आहे. मित्रांनो, हा विषय येथेच संपत नाही…..

अपूर्ण : हेमंत जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद आयोजनाबाबत आढावा बैठक

Fri Jan 13 , 2023
नागपूर : नागपूर येथे मार्च महिन्यात आयोजित होणाऱ्या जी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोर्जे, जी-20 अयोजन समीतीचे सौशेरपा स्वदेश सिंह, किरण डि . एम. आदी उपस्थित होते. 21 आणि 22 मार्च 2023 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!