– आमदार/कामदार चरणसिंग ठाकूर यांचे कडून अपेक्षा
कोंढाळी :- युवक/युवतीं तसेच आप आपल्या गावातील/नागरी भागातील खेळाडूं शिस्त व पुस्तकी ज्ञानाबरोबरच मैदानी खेळातही तो पारंगत असायला हवा.या करिता गाव तिथे खेळाचे मैदानाची केंद्र सरकार ची संकल्पना आहे. मात्र ही संकल्पना फक्त कागदावरच राहिली आहे. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात बऱ्याच ठिकाणी मैदान नाही म्हणून युवक/ युवती/खेळाडूंना सरावासाठी खेळाचे मैदान उपलब्ध होत नाही.
नेमका हाच ज्वलंत प्रश्न नगर पंचायत कोंढाळी येथील युवती व खेळाडूं समोर आ वासून उभा आहे.
माजी आमदार अनिल देशमुख यांनी येथील ग्रा प चे तसेच येथील खेळाडूंचे मागणीवरून येथील सोनेगाव येथील सर्हे क्रं एक मधील फास्टेस्ट झुडपी जागेवर .98हे आर.जागेवर खेळाचे मैदानाबाबद पाहणी केली होती . याच दरम्यान कोंढाळी ग्राम पंचायतीचे नगर पंचायत मधे रुपांतर झाले व प्रशासक नियुक्त आहेत.
आता नवा गडी नवा राज या प्रमाणे कोंढाळी नगर पंचायत हद्दीतील सोनेगाव येथील सर्हे क्रं एक मधील जागेत खेळाचे मैदान उपलब्ध करून देण्यासाठी नुतन आमदार तथा कामदार चरणसिंग ठाकूर यांनी या प्रकरणी पुढाकार घेऊन कोंढाळी येथील युवक युवतीं तसेच खेळाडूं करीता क्रीडा संकुलाची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी युवक युवती खेळाडूंना कडून करण्यात येत आहे.