नागपूर :- ग्रामीण हद्दीत महामार्गावर मोकाट जनावरांच्या कळपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असुन त्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाणात वाढ झाली आहे. सदर बाबीची दखल मा. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार यांनी घेतली असुन ज्या मालकांची जनावरे रस्त्यावर मोकाट फिरत असतील अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. नागपूर ग्रामीण पोलीसांनी रस्ते वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील मोकाट जनावरांच्या मालकावर कारवाई केली. यामध्ये पोस्टे देवलापार अंतर्गत एकुण ०८. जनावरांचे मालकांवर महाराष्ट्र पोलीस कायदा १००, १०६, १०७ अन्वये कारवाई करण्यात आली.
सदर कार्यवाही ही पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण हर्ष ए पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे देवलापार येथील ठाणेदार सपोनि नारायण तुरकुंडे यांचे पञ्चकाने पार पाडली.