“…तर मी राजीनामा देईन आणि निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. अनेक मराठा आंदोलनकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जात आहे. आता मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मैदानात उतरलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केले आहे. “एकनाथ शिंदेंना आरक्षण द्यायचे आहे, पण देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देण्यासाठी थांबवत आहेत”, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. आता यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. बहुतांश वेळा मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठीही बसले आहे. त्यातच जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेकदा टीका करताना दिसतात. आता मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस त्यांना थांबवत आहेत’, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपावर आता देवेंद्र फडणवीसांनी मोठे विधान केले आहे. मी आरक्षणात अडथळा आणला असं जर एकनाथ शिंदे म्हणाले, तर मी त्याचवेळी राजीनामा देईन, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

राजकारणातून संन्यासही घेईन”

देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आजपर्यंत मराठा समाजासाठी जे काही निर्णय झाले ते एकतर मी केले. माझ्यानंतर एकनाथ शिंदेंनी केले आणि शिंदेंच्या पाठीशी मी भक्कमपण उभा राहिलो आहे. त्यामुळे अशाप्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा सांगतो जर एकनाथ शिंदेंनी सांगितलं की मराठा आरक्षणासाठी त्यांना निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केला आहे, मी तो निर्णय होऊ दिला नाही, त्याचक्षणी मी राजीनामा देईन. तसेच राजकारणातून संन्यासही घेईन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“…आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”

मला कल्पना आहे की, मनोज जरांगे यांचे माझ्यावर विशेष प्रेम आहे. मात्र हे देखील सांगितलं पाहिजे की राज्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. मी त्याही पुढे जाऊन सांगतो की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम करत आहोत. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ आहे. त्यामुळे त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Source by tv9 marthi

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेच्या उदघाटन सत्रात नेत्यांच्या सत्राच्या समारोपप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Mon Aug 19 , 2024
महामहिम, महानुभाव, आपणा सर्वांचे बहुमूल्य विचार आणि सूचनांसाठी मी आपले हार्दिक आभार मानतो. आपण सर्वांनी आपल्या समान चिंता आणि महत्त्वाकांक्षा समोर मांडल्या. आपणा सर्वांच्या विचारांवरून हे स्पष्ट आहे की ग्लोबल साऊथ देशांमध्ये एकजूट आहे. आपल्या व्यापक सहभागाचे प्रतिबिंब आपल्या सूचनांमध्ये दिसून येते. आज आपल्या चर्चांमधून एकमेकांशी सामंजस्य राखत पुढे जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. यामुळे आपली सामायिक उद्दिष्टे प्राप्त करणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com