संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लघु दाब वाहिनी च्या तीन खांबा वरील विधृत तार व एक लोखंडी खांब कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वाघधरे वाड़ी कन्हान येथुन चोरुन नेल्याने फिर्यादी च्या तक्रारीवरून कन्हान पोलीसानी चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास करित आहे.
बुधवार (दि.२४) एप्रिल २०२४ ला सकाळी अंदाजे ६.३० ते ८.३० वाजता दरम्यान वाघधरे वाडी खंडेलवाल कंपनी मधुन जाणारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची लघुदाब विधृत वाहिनी च्या तीन खांबावरील विधृत तार व एक लोखंडी खांब किमत ५०४६० रूपयाचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेली आहे. अश्या फिर्यादी कांता विठ्ठल सिडाम वय ३० वर्ष वरिष्ठ तंत्रज्ञ मा. रा. वीज वितरण केंद्र कन्हान शहर यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात हेकॉ सतिश फुटाणे हयानी पोस्ट ला कलम ३७९ भादंवि, भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३, १३६ अन्वये अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा नोंद करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.