संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बाबा अब्दुल्लाह शाह दरगाह परिसर राहिवासी 21 वर्षोय तरुणी ही दिवाळी च्या एक दिवसापूर्वी मध्यरात्री तीन दरम्यान घरून निघून गेली मात्र बराच वेळ होउम घरी परतली नाही यासंदर्भात घरमंडळींनी शोधाशोध करूनही कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.अखेर यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंगची नोंद करून घेतली आहे .या बेपत्ता तरुणीचे नाव प्रिया विशाल जाखरिया वय 21 वर्षे रा गुजरात असे आहे.
सदर बेपत्ता तरुणी ही 5 फूट उंचीची असून बांधा सळपातळ आहे.रंग गोरा, भाषा मराठी,हिंदी, गुजराती,अंगात पांढरा लेंगी व हिरवा टॉप परिधान केलेला आहे असे वर्णनाचे तरुणी दिसल्यास कामठी पोलीस स्टेशन ला संपर्क साधावे असे आवाहन पोलीस विभागातर्फ करण्यात आले आहे