संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड कन्हान येथील बीएसएनएल कार्यालय व ग्रोमर वेंचर्स कंपनी अश्या दोन स्थळावरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एकुण २०,१६० रुपयांचा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहितीनुसार तारसा रोडवरील पोलीस उपविभागीय कार्यालय कन्हान जवळील बीएसएनएल कार्यालयात फोन मॅकेनिक नरेश विश्वनाथ बोधनकर वय ५६ वर्ष रा. यादव नगर नागपुर व अधिकारी भूषण घोरपडे असे दोघे कार्यरत असुन कार्यालय सकाळी १० वाजता सुरू करून सायंकाळी ७ वाजता बंद कर तात. बुधवार (दि.९) ला सकाळी ८ वाजला नेहमी प्रमाणे कन्हान तारसा रोड वरील बीएसएनएल कार्या लयात येऊन कार्यालय सुरू करून बाथरूम मध्ये गेले असता बाथरुमच्या बाजुच्या भिंतीला गड्डा दिसला.त्या भितीच्या बाजुला जनरेटर बॅटरी ठेवलेली होती, ती दिसली नाही. आजुबाजुला शोध घेतला तरी मिळुन आली नसल्याने कोणीतरी अज्ञात इसमाने चोरी केली असल्याने फिर्यादी नरेश बोधनकर याने कन्हान पोलीस स्टेशन ला बॅटरी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच दुसरी घटना ग्रोमोर वेंचर्स कंपनी मागिल परिसरात जुने बंद अवस्थेत विधृत लोखंडी खांब १७ लागलेले होते. (दि.१०) ऑगस्ट ला सकाळी ८ वाजता सुपरवाईझर मंगेश धांडे घरी हजर असताना सुरक्षा रक्षक निलेश निंबोने याने फोन करून सांगितले की, आपल्या कंपनीच्या मागिल भागातील विधृत लोखंडी खांब चोरी झाले आहे. अशा माहीतीने कंपनीत जाउन पाहीले तर कंपनी मागच्या भागात लागलेल्या १७ जुन्या विधृत लोंखडी खांबा पैकी ६ खांब दिसुन आले नाही. (दि.९) चे सायं.७ ते (दि.१०) ऑगस्टचे सकाळी ८ वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने विधृत लोंखडी ६ खांब किंमत ६००० रुपयाचा माल चोरी करून नेल्याने कन्हान पोलीसानी (दि.१२) ऑगस्ट ला फिर्यादी मंगेश पुरूषोत्तम धांडे वय २८ वर्ष ग्रोमोर वैचर्स कंपनी सुपरवाईझर यांचे तक्रारी वरून पोस्टे ला अप क्र.५२१/२३ कलम ३७९ भादंवि अन्वये अज्ञा त आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला. कन्हान पोलीस स्टेशन चे पोहवा विनोद पाल यानी फिर्यादींच्या तक्रारी ने दोन्ही चो-याचा पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपींचा शोध घेत आहे.