संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- रामनगर तिवाडे ले-आऊट येथिल रहिवा सी राजेंद्र हटवार हे बाहेर गावी गेले असल्याची संधी साधुन त्याच्या बंद घराचे कुलुप तोडुन घरातील आल मारीतील सोन्याची अंगठी व नथ असा अठरा हजार रूपयाची चोरी केल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून पो स्टे कन्हान ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे.
राजेंद्र नामदेवराव हटवार वय ५५ वर्ष, रा. राम नगर तिवाडे लेआऊट कन्हान हे पत्नी व दोन मुलासह सोमवार (दि. २४) ला संध्याकाळी ४ वा. गडचिरोली येथे वडील मरण पावल्याने जेवणाचा कार्यक्रमास नाते वाईकाकडे स्वतःच्या कार ने गेले होते. तेथुन मंगळवार (दि.२५) ला रात्री ११ वाजता घरी परत आले तर घरातील लाईट चालु दिसला व खिडकी थोडीशी उघडलेली दिसुन काही सामान वाकलेले दिसले. सामोरून गेलो असता दरवाजाचे कुलुप तुटलेले असुन आतील कडी लावलेली असल्याने मागुन गेलो असता घराचा मागचा दरवाजा उगडा असल्याने आत गेलो तर रूम मधिल पूर्ण सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. आलमारीचे कुलुप तुटलेला होते. तेव्हा आलमारीची पाहणी केली असता आलमारी मध्ये सोन्याची अंगठी अंदाजे वजन ५ ग्रँम जुनी किंमत १५००० रू. सोन्याची नथ वजन १ ग्रँम जुनी किंमत ३००० रु. असा एकुण १८००० रूपयाचा मुद्देमाल दिसुन न आल्याने (दि.२४ ) चे संध्याकाळी ४ वा. ते (दि.२५) जुन २०२४ चे रात्री १०.३० वाजता दरम्यान कोणीतरी अज्ञात चोराने घरा चे कुलुप तोडुन आत प्रवेश करून आलमारीतील सोन्याची अंगठी व नथ असा १८,००० रूपयाचा मुद्दे माल चोरून नेल्याची कन्हान पोस्टे ला फिर्यादी राजेंद्र हटवार यानी तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी अज्ञात चोरा विरुध्द कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून ठाणेदार उमेश पाटील यांचा मार्गदर्शना त कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.